Jaimaharashtra news

गडचिरोलीत १३ नक्षलवादी ठार

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये पोलीस सी -60 जवानासोबत झालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी आणि सी-60 तील जवान,पोलीस यांचे अभिनंदन केले आहे.

नक्षलवाद्यांना ठार करणाऱ्या जवानांचे शुक्रवारी संध्याकाळी जल्लोषात गडचिरोलीमध्ये स्वागत करण्यात आले. सी सिक्स्टी कमांडो हे माओवादविरोधी विशेष पथक असून शुक्रवारी जवान मुख्यालयात पोहचताच गडचिरोली पोलिसांच्या बँड पथकाकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यालयातील जवानांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाळ्या वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

कसनासूर चकमकीनंतरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. २०१८ मध्ये ४० माओवादी कसनासूर चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर आज १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Exit mobile version