Thu. Jun 17th, 2021

कॉंग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाचा डॉक्टरवर हल्ला

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तथा आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लाॅरेन्स गेडाम याने डॉक्टरला मारहाण केली आहे. सरकारी कोरोना रुग्णालयातील डॉ.अभिजित मारबते यांना मारहाण केली. गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी गोळ्या देण्यावरून लॉरेन्स आणि डॉक्टरमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

गडचिरोलीमधील बर्डी भागात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास लॉरेन्स गेडाम आपल्या गृहविलगीकरणात असलेल्या नातेवाईकाची औषधे घेण्यासाठी गेले होते. तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी गोळ्या दिल्या, पण यावेळी अतिरिक्त गोळ्या देण्यावरून कर्मचारी आणि नोडल अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांच्याशी बाचाबाची झाली. यावेळी लॉरेन्सने शिवीगाळ करत डॉ.मारबते यांना मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *