Tue. Jun 15th, 2021

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा दुसरा हल्ला

 

लोकसभा निवडणुकांच्या मतदानाच्या गडचिरोलीच्या वाघेझरी मतदान केंद्रावर आज सकाळी 11 च्या सुमारास भुसुरूंगाच्या स्फोटाने काही काळ खळबळ माजली होती. आता संध्याकाळच्या 4 वाजण्याच्या सुमाराला मतदान केंद्रावरून परतणाऱ्या सीआरपीएफच्या जवांनावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

नक्षलवाद्यांकडून दिवभरातील दुसरा हल्ला 

धानोरा येथील तुमडीकसा गावात 4 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

या हल्ल्यानंतर जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

तुमडीकसा गावाजवळ असलेल्या 283 क्रमांकाच्या बूथवरील जवान मतदान आटोपल्यानंतर परतताना हा प्रकार घडला.

यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला असून यामध्ये तीन जवान जखमी झाले आहेत.

हे जवान सीआरपीएफच्या 113 व्या बटालियनचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *