Tue. Jun 18th, 2019

गडचिरोलीत फेरमतदानाला अत्यल्प प्रतिसाद

31Shares

गडचिरोली मध्ये ११ एप्रिलला झालेल्या मतदानाला नक्षल कारवायांमुळे पूर्णविराम लागला होता, त्या पार्श्वभूमीवर आज 15  एप्रिलला सकाळी7  ते 3 या वेळामध्ये फेरमतदान ठेवण्यात आले आहे.  एटापल्ली तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या चार मतदार केंद्रावरती फेरमतदान होत आहे. परंतु नक्षली कारावायांना घाबरून मतदारांनी आजच्या मतदानाला अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. मतदारांची 1 टक्क्याहून सुद्धा कमी उपस्थिती असल्याने ऩक्षली कारवायांची दहशतीचे सावट  या फेरमतदानावर पडले असल्याचं समजतय.

नक्षलवाद्यांच्या दहशतीचे सावट 

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजेच ११ एप्रिलच्या मतदानामध्ये गडचिरोलीचा समावेश होता.

पण त्याच दिवशी मतदान केंद्रावर भुरूंग स्फोट आणि गोळीबारांच्या हल्ल्यांमुळे मतदानाला पूर्णविराम लागला होता.

एटापल्ली तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या चार मतदार केंद्रावरती फेरमतदान होत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आज 15  एप्रिलला सकाळी7 ते 3 मध्ये त्याच मतदानाचे फेरमतदान ठेवण्यात आले होते.

पण आधीच्या नक्षली कारवायांची दहशत इतकी आहे की आजच्या मतदानाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे.

एक टक्क्याहूनही कमी इतकीच आत्तापर्यंत मतदानाची नोंद झालेली आहे.

यावरून या भागामध्ये नक्षलींच्या दहशती कारवायांचा अंदाज लावता येईल.

31Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *