Wed. May 19th, 2021

गडचिरोलीत भूसुरुंग स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला

लोकसभा निवडणुकांंमध्ये गडचिरोलीच्या वाघेझरी मतदान केंद्रावर आज सकाळी 11 च्या सुमारास भुसुरूंगाच्या स्फोटाने काही काळ खळबळ माजली होती. आता संध्याकाळच्या 4 वाजण्याच्या सुमाराला मतदान केंद्रावरून परतणाऱ्या सीआरपीएफच्या जवांनावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर भूसुरूंग स्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला असून यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ढेका नदीच्या पुलाखाली हा भूसुरूंग पुरून ठेवला होता.

नेमकं काय घडलं ?

गडचिरोली जिल्यातील अति दुर्गम भागात धानोरा तालुक्यापासून दीड किलोमीटर अंतरावर भूसुरूंग पेरण्यात आला होता.

हा भूसुरुंग ढेका नदीच्या पुलाखाली पेरण्यात आला असल्याचं पोलीसांनी सांगीतलं आहे.

निवडणूक अधिकारी व पोलीस दल परततांना घातपात घडविण्याचा नक्षल्यांचा डाव होता,

पोलिसांच्या सतर्कतेने हा घातपात उधळण्यात आला आहे.

गडचिरोलीच्या वाघेझरी मतदान केंद्रावर आज सकाळी 11 च्या सुमारास भुसुरूंगाच्या स्फोट झाला.

संध्याकाळच्या 4 च्या सुमारास मतदान केंद्रावरून परतणाऱ्या सीआरपीएफच्या जवांनावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला.

यामुळे गडचिरोली लोकसभा मतदारसंघात सुरक्षेच्या कारणास्तव 3 वाजेपर्यंत मतदान संपवण्यात आलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *