Sun. May 16th, 2021

गडकरींनी दिला पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा

स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी दोन हात करत अखेरच्या श्वासापर्यंत कार्यमग्न राहिलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भावूक झाले. पर्रिकरांसोबत असणाऱ्या मैत्रीच्या आठवणींना गडकरी यांनी उजाळा दिला.

पर्रिकरांचा साधेपणा हा नेहमीच कौतुकाचा विषय ठरायचा. त्यांचं साधं राहणीमान लोकांना कायम आकर्षित करायचं. मुख्यमंत्री पदावर रूजू झाल्यावरही त्यांच्या राहणीमानात कधी बदल झाला नाही. जो साधेपणा स्वभावात राहिला तो त्यांच्या कपड्यांमध्येही राहिला. याबद्दल गडकरी यांनी आठवण सांगितली. देशाच्या संरक्षणमंत्रीपदी पर्रिकर यांची निवड झाल्यावर पर्रिकरांना आपण दिल्लीतल्या थंडीची कल्पना दिली होती. मात्र तरीही पर्रिकर यांनी आपण हाफ शर्टच घालणार असं म्हटलं आणि दिल्लीमध्येही आपली साधी राहणी तशीच ठेवली.

पर्रिकरांचा शेवटचा कार्य़क्रम ठरला…

पणजी मधल्या मांडवी नदीच्या पुलाच्या उद्घाटनासाठी मला पर्रिकरांचं आवर्जून बोलावणं आलं होतं.

‘हा कार्यक्रम माझा शेवटचा आहे’, असं ते बोलून गेले होते.

या उद्घाटनासाठी ते विशेष उत्सुक होते, परिस्थिती नसतानाही ते खुर्चीवर बसून आले.

भाषण करून ते निघून गेले.

हा कार्यक्रम त्यांचा खरोखरच शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला.

त्यांच्या आठवणींबद्दल बोलताना गडकरी भावूक झाले.

पर्रिकरांच्या जाण्याने माझ्या व्यक्तिगत आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे.

गोव्याच्या सेवेसाठी पर्रिकरांनी स्वत:चे अखंड आयुष्य लावले, त्यांची जिद्द आणि प्रचंङ इच्छाशक्ती मला भारावून टाकायची.

त्यांच्या जाण्याने मला तीव्र दु:ख होतंय.

पर्रिकरांचा राजकीय प्रवास आपण जवळून पाहिला असल्याचंही म्हटलं.

गोव्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना मनोहर पर्रिकर, श्रीपाद नाईक, संजीव देसाई, दिगंबर कामत यांच्या सोबत काम केल्याचंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *