Sun. Jun 13th, 2021

Game of Thrones ; योझू कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लिन ची यांचा मृत्यू

चहामधून देण्यात आलं विष…

योझू कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे जगभरामध्ये गेम ऑफ थोन्स या गेमचे निर्माते म्हणून प्रसिद्ध होते. लिन ची यांचा मृत्यू ख्रिसमसच्या दिवशी झाला असून यावर एक खुलासा झाला आहे. प्राथमिक तपासामध्ये लिन ची यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना चहामधून विष देण्यात आलं. यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. शंघाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिन ची यांचे सहकारी जू याओ यांना या प्रकरणामध्ये प्रमुख संशयित असल्याच्या दिशेने पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला आहे. अटक करण्यात आलेल्या जू याओ यांनी युझूच्या चित्रपट निर्मिती विभागाचे प्रमुख आहेत. लिन ची याचं वय ३९ वर्ष होते. शिवाय सध्या ते नेटफ्लिक्सवरील चित्रपटांचे निर्माता म्हणूनही नावारुपास आले होते. डेव्हलपर म्हणून त्यांची ओळख ही जगभरात होती.

हुरुन चायनाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये लिन ची यांची एकूण संपत्ती ६.८ बिलियन युआन म्हणजेच ७६ अरब ६० कोटी रुपये इतकी आहे. शुक्रवारी लिन यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या कंपनीचे अनेक माजी कर्मचारी आणि चाहते शोक व्यक्त करण्यासाठी योझूच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. शिवाय २०१४ मध्ये शेन्जेन स्टॉक एक्सेंजमध्ये ही कंपनी लिस्टेड झाली.

चीनमधील गेमिंग बाजारामध्ये लिन ची हे लोकप्रिय होते. शिवाय चित्रपट निर्मिती क्षेत्रातही कार्यरत होते. मोबाईल गेमिंग आणि गेमिंग क्षेत्रामध्ये लिन ची यांनी चांगलं नाव कमावले होतं. लिन ची यांनी २००९ साली योझू कंपनीची स्थापना केली. योझू ही गेम डेव्हलपर आणि ब्राउझर तसेच मोबाइल गेम पब्लिशर आहे. ही कंपनी प्रामुख्याने आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये व्यापार करते. लिनच्या मृत्यूनंतर विबो या चीनमधील लोकप्रिय वेबसाईटवर गुडबाय यूथ असं म्हणत लिनला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *