Sat. Jul 31st, 2021

‘Game of Thrones’च्या शेवटच्या सिझनबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता

एप्रिल महिन्याची वाट आपण उन्हाळाच्या सुट्ट्यांसाठी बघत असतो. मात्र यावेळी एप्रिलची वाट काही वेगळ्याच कारणासाठी चर्चेत होती. तरुणांना उत्सुकता होती ती ‘Game Of Thrones’ या सिरीजची.

‘Game Of Thrones’ ही जगभरात गाजत असलेली अत्यंत लोकप्रिय सीरिज आहे.

भारतातही या सीरिजने विशेषतः तरुणांना प्रचंड वेड लावलं आहे.

या सिरीजचा आठवा आणि शेवटचा सीझन 14 एप्रिलपासून सुरू झालाय.

‘Winterfell’ असं पहिल्या एपिसोडचे नाव आहे.

विशेष म्हणजे हा एपिसोड बघण्यासाठी लोकांनी अलार्म सेट केला होता.

हा एपिसोड Hot Star वर  प्रदर्शित करण्यात आला. या सीझनसाठी फॅन्स गेले 2वर्षांपासून वाट बघत होती.

मात्र अखेर ही प्रतिक्षा Worth the wait ठरली आहे. काही फॅन्स तर 595 दिवस काऊंटडाऊन करत होते.

‘Game Of Thrones’ 2011 साली प्रेक्षकांच्या भेटीला आली.

George RR Martin यांच्या ‘The Songs of Ice and Fire’ या महाकादंबरीवर ही सीरीज बनवण्यात आली आहे.

ही सीरिज म्हणजे आपल्याकडच्या महाभारतासदृश महाकाव्यासारखी आहे.

सिंहासनासाठी सात राजसत्तांचं आपसांत सुरू असणारी युद्धं, त्यांचे परस्परसंबंध, नाती आणि चमत्कृतीपूर्ण गोष्टी यांमुळे ही सीरिज प्रचंड लोकप्रिय ठरतेय.

Jon Snow, Daenerys Targaryen, Tyrion Lannister, Ariya Stark, White Walker अशा शेकडो  कॅरेक्टर्समुळे सिरीजमध्ये रंगत आली आहे.

2017 साली Game Of Thrones चा 7वा सीझन प्रदर्शित झाला होता.

मात्र यावेळी या सीझनचे काही एपिसोड लिक करण्यात आले होते.

यामुळे त्यांचं प्रचंड नुकसानही झालं.

यामुळे पुन्हा असं होऊ नये म्हणून याची काळजी घेण्यात आली आहे.

तसंच सीझन 8 मध्ये फक्त 6 एपिसोड्स आहेत.

या सीझनचे वेगवेगळे शेवट shoot करण्यात आले आहेत. त्यामुळे खुद्द कलाकारांनाही खरा शेवट माहीत नाही.

विशेष म्हणजे या period drama साठी वापरण्यात येणारे कपडे दिल्लीमधील फॅशन बुटिकमध्ये तयार करण्यात येत आहेत.

Hotstar वर Game of Throne पूर्णपणे uncensored दाखवण्यात येणार आहे, तर Star World वाहिनीवर censored version दाखवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *