Mon. Oct 25th, 2021

खड्डे ,कोसळणारी इमारत आणि वाहतूक कोंडीचा देखावा

उल्हासनगर शहरातील खड्डे, कोसळणारी इमारत आणि वाहतूककोंडीने नागरिकांना रडकुंडीला आणले असताना विराजमान झालेल्या गणेशोत्सवातही या त्रासाचे प्रतिबिंब उमटले आहे.

उल्हासनगरच्या दिनेश राजपाल कुटुंबियांनी घरच्या गणपती बाप्पांसमोर उल्हासनगर ‘शहरातील खड्डे , कोसळणारी इमारत आणि वाहतूक कोंडी’चा देखावा साकारत या विघ्नातून सुटका करण्यासाठी विघनहर्त्याला साकडे घातलंय.

रस्त्यावरील खड्डयांनी आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतले आहेत.

अरुंद रस्त्यांमुळे संपूर्ण शहर वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकले आहे.

तसंच शहरातील इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अनेकदा स्लॅब किंव्हा इमारत पत्त्यांसारखी कोसळून अनेकांचे जीव गेले आहे.

त्यामुळे गणपती बाप्पालाही त्याच्या डोळ्यांसमोर सतत हेच चित्र दिसत असेल.

हा विचार करून आपण हा देखावा साकारल्याचे दिनेश राजपाल यांनी सांगितले.

या सर्व संकटातून नागरिकांची सुटका व्हावी आणि उल्हासनगर महापालिकेलाही ती सुबुद्धी सुचावी यासाठी अशा प्रकारे थेट बाप्पांना साकडं घालण्यात आलं आहे. यातून आपले राजकारणी आणि प्रशासन कितपत बोध घेतात हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *