Mon. Jan 17th, 2022

गणपती स्पेशल रेसिपी : शुगर फ्री मोदक

सणावाराला आपल्या घरी गोड-धोडाचे पदार्थ बनवतात. पण गोड खाऊन वजन वाढते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी शुगर फ्री मोदक घेऊन आलोय. जेणेकरून मधूमेह असलेल्यांसाठी हा मोदक आरोग्यास उपयुक्त आहे.   

साहित्य: –

खजूर – 1 कप  (बारीक केलेले)

मावा – 1 कप ड्रायफ्रूट (काजू, बदाम, किसमिस)

किसलेलं खोबरं – 1 कप  

तूप – ½  चमचा

कृती:-

  • प्रथम एका कढईत तूप टाका. नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून ते लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • नंतर ते मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.
  • त्याच तव्यावर खजूर घालून ते मिश्रण गरम करून, खजूर बारीक करून घ्या.
  • त्यानंतर खोबऱ्याचा किस टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.
  • गॅस बंद करा. ते मिश्रण थंड होऊ दया.
  • मिश्रण थंड झाल्यावर ते मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवा.   
  • हे मोदक 10 ते 15 दिवससुध्दा राहू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *