Mon. Jan 24th, 2022

तुमच्या लाडक्या बाप्पासाठी हा माव्याच्या मोदकाचा नैवद्य

मोदक म्हणजे गणपतीचा आवडता नैवेद्या. गणेशोत्सवात विविध प्रकारचे मोदक गणपतीला अर्पण केले जातात. काहीजण उकडीचे तर काहीजण तळणीचे मोदक बनवतात. तर माव्याचे मोदकही विकत आणले जातात. पण घरच्या बाप्पाला बाहेरचे मोदक कशाला? माव्याचे मोदक तुम्ही घरीही करू शकता…

साहित्य:

मैदा – 2 कप

रवा –¼ कप

तूप –½ टे. स्पून
तेल- तळण्याकरता

 

मोदकाचे सारण

मावा – 200 ग्रॅम

पिठीसाखर – 150 ग्रॅम

बदामाचे तुकडे

पिस्त्याचे तुकडे

वेलची पावडर- चिमुटभर

 

कृती:-

  • प्रथम मैदा आणि रवा चाळून घ्या. नंतर ते मिश्रण एका परातीत घेऊन त्यात तेल टाका. त्यानंतर यात थोडे पाणी टाकून मिश्रण चांगले मळून घ्या. मळलेले पीठ एका ओल्या कापडात झाकून ठेवा.
  • एका कढईत मावा घालून तो लालसर होईपर्यंत भाजून घ्या. नंतर तो मावा एका ताटात काढून थंड होण्यास ठेवा.
  • सारण तयार करण्यासाठी पीठी साखर, माव्याचे तुकडे आणि वेलची पावडर घालून ते मिश्रण एकजीव करा.
  • त्यानंतर मैदा चांगला मळून घ्या. नंतर त्याचे छोटे तुकडे करून घ्या.
  • त्या पीठाच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. त्यामध्ये सारण भरून नंतर पुरीच्या कडेला पाणी लावून त्याच्या 8-9 पारी बनवा. त्याला मोदकाचा आकार द्या. हे मोदक ओल्या कापडाने झाकून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करून हे मोदक लालसर तळून घ्या.

 

आशाप्रकारे झाले आपले माव्याचे मोदक तयार… तर हे माव्याचे मोदक या आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी नक्की बनवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *