Jaimaharashtra news

अंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा

पर्यावरणाची काळजी घेत, जेबी नगर स्थित रिद्धी सिद्धी मंडळाने आपल्या ४६ व्या वर्षी टिश्यू पेपरपासून गणेशमूर्ती बनवली आहे. गणेश मूर्तीची स्थापना केल्यानंतर अनेक भाविक या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत आहे.

कोविडमुळे उत्सवाचे वातावरण नसले तरी, या मंडळातील भाविकांनी गणेशमुर्तीचे भव्य दिव्य स्वागत केले आहे.

मागील अनेक वर्षापासून रिद्धी सिद्धी गणेश मंडळ अनेक सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करत आहे, ज्यात महिला सक्षमीकरण, तरुणांमध्ये मानसिक तणाव वाढणे, खड्ड्यांचा विषय आणि ट्रान्सजेंडरच्या समस्या यावर प्रकाश टाकण्याचे काम करत आहे.

आयोजक किरण पटेल म्हणतात, “या वर्षीची गणेश मूर्ती टिश्यू पेपर, तुरटी आणि घाटीच्या डिंकातून बनवली आहे.

पर्यावरणावर लक्ष ठेवून सर्व मंडळ कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात ते बनवणे कठीण असते आणि खूप वेळ लागतो. असे असले तरी, समाजाला नैसर्गिक गोष्टींसाठी संवेदनशील बनवण्यासाठी या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. ” तसेच यावर दिनेश चिंदरकर, कार्यकर्ते म्हणतात, “दरवर्षी आम्ही एक सामाजिक मुद्दा मांडतो आणि त्यावर जागरूकता पसरवतो. यावर्षी, आम्ही हा प्रयोग लोकांना साथीच्या आजारामुळे पर्यावरणाचे महत्त्व आणि येणाऱ्या पिढीसाठी योग्यतेची जाणीव करून देण्यासाठी केला आहे.टिश्यू पेपरने बनवलेल्या या गणेशमुर्तीला बनवण्यासाठी जवळपास २ महिने लागले आहे.

Exit mobile version