पुणेकर म्हटंल की काहीतरी वेगळेपण आलचं असंच एक वेगळेपण आजच्या गणेश विसर्जन मिरवणूकीत पाहायला मिळालं आहे.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत नेहमीच वेगळेपण पाहायला मिळतं, मात्र ही मिरवणूक पाहून सध्या वाढत चाललेली इंधन दरवाढ याला पर्याय म्हणून की काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीचं पडेल.
पुण्यात घरगुती बाप्पाची मिरवणूक चक्क छोट्या मुलाच्या खेळण्यातील गाडीतून काढण्यात आली आहे.
बाप्पाची आगळी-वेगळी मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
बाप्पाची काढलेली ही मिरवणूक म्हणजे अस्सल पुणेकर काहीही करु शकतात याचं उत्तम उदाहरण आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही