Fri. Jul 30th, 2021

गणेशभक्तांचा कोकणातील प्रवास यावर्षीही खडतर ठरण्याची चिन्हं!

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणेशभक्तांची कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र यंदाही गणेशभक्तांचा कोकण प्रवास खडतर ठरण्याची चिन्हं आहेत. गेल्या दहा वर्षांपासून बांधकाम सुरू असलेला मुंबई गोवा महामार्ग यावर्षीही अपूर्णच राहिला आहे. गणेशभक्तांचा कोकणातील प्रवास यावर्षीही खडतर ठरणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे पहिले दोन टप्पे रायगड जिल्ह्यात येतात.

पळस्पे ते इंदापूर आणि इंदापुर ते पोलादपूर या दोन्ही टप्प्यातील काम आजमितीला अर्धवट आहे.

कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे पहिल्या टप्प्यातील कामाचा ठेकेदार बदलण्यात आला. मात्र यानंतरही कामाला गती मिळाली नाही.

यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मोठमोठे खड्डे, धोकादायक डायव्हर्शन, पूल आणि मोऱ्यांची अपूर्ण कामं, खडीमुळे निसरडा झालेला रस्ता, रस्त्यावर चिखल आणि धुळी साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त होत आहेत.

आजमितीस या ठिकाणी सामान्य वाहतूक असूनदेखिल पनवेल ते वडखळदरम्यानची वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाहन या रस्त्यावर आल्यानंतर परीस्थिती गंभीर होण्याची चिन्हं आहेत.

खडी, ग्रीट टाकुन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे, पेव्हर ब्लॉक टाकण्याचं काम केलं जात आहे. मात्र हे काम अपुरं पडत आहे. यामुळे पावसात चिखल तर पाऊस नसेल तर वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट निर्माण होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *