Fri. Aug 6th, 2021

मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना मालेगाव मध्ये घडली आहे. त्या नराधमांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं ?

 

मालेगावात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

त्या नराधमांनी  या घटनेचा  व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल  केला आहे.

या प्रकरणी एका महिलेसह  तिघा संशयितांना पवारवाडी पोलीसांनी अटक केली आहे.

असून मुख्य संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

संशयित महिलेने 17 वर्षीय अल्पयीन मुलीला घरातून फूस लावून एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले.

त्याठिकाणी मोहमद निजामुद्दीन अब्दुल अजीज ,अब्दुल अजिज इकबाल अहमद , सईद वायरमन यांनी तिच्यावर अतिप्रसंग केला.

यांनी त्या घटनेचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.

यामध्ये संशयित महिलेसह मोहमद निजामुद्दीन अब्दुल अजीज, अब्दुल अजिज इकबाल अहमद या दोघांना ताब्यात घेतले आहे.

तर मुख्य संशयित सुत्रधार सय्यद वायरमन अद्याप फरार आहे.

त्यांना न्यायालयाने शुक्रवार 17मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *