Tue. Aug 20th, 2019

मित्राला झाडाला बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!

0Shares

विरार येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मित्राबरोबर पीडित मुलगी निर्जन स्थळी बोलत उभी असताना नराधमांनी तिच्या मित्राला झाडाला बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

काय घडलं होतं?

15 एप्रिल रोजी 15 वर्षीय पीडित मुलगी रात्री 8 च्या सुमारास मावस बहिणीकडे जात होती.

यावेळी जीवदानी रोडवरील ठाकूर शाळेच्या मागील सूनसान रस्त्यावरून जात असताना तिला तिचा मित्र भेटला.

त्याच्यासोबत बोलत थांबली असताना नराधमांनी दोघांना हटकलं.

मित्राला मारहाण करून झाडाला बांधलं आणि मुलीला झुडपांमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केला.

या घटनेबद्दल पीडितेच्या आईने पोक्सो कायद्यांतर्गत दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवला.

त्यांपैकी एक आरोपी अकलूज येथे जाऊन लपला होता. खबरीच्या मदतीने पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. अंधारामुळे पीडितेला आरोपींना नीट पाहता आलं नव्हतं. त्यामुळे तिलाही आरोपींना ओळखणं कठीण झालं होतं. मात्र विरार पोलिसांनी यांतील एकाला पकडल्यावर लवकरच दुसरा आरोपीही पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *