Fri. Jan 21st, 2022

अल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नाशिकमध्ये ही घटना घडली. पीडित मुलगी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असताना नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शेतात पीडित मुलगी एकटी दिसल्यानं आरोपींनी उसाच्या शेतात नेऊन आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला.

 

मुलीच्या आईला सगळा प्रकार समजल्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यात एक आरोपी अल्पवयीन आहे. अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहमध्ये पाठवण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *