कचरा उचलणा-या वाहनाची बाईकला धडक, दोघांचा मृत्यू

नालासोपाऱ्यात वसई विरार महानगरपालिकेच्या कचरा उचलणा-या गाडीने बाईकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नितेशकुमार दिवेदी आणि अभिषेक हरिकेत सिंग असे मृत तरुणांचे नाव आहे. हे दोघेही 20 वर्षांचे होते. बाईकला धडक देणारा वाहनचालक फरार झाला आहे.
नालासोपारा पूर्वेतील तुलिंज येथील वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयासमोर ही घटना घडली. रात्री अडीच वाजता हा अपघात झाला आहे.
वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.