Tue. Oct 26th, 2021

अभिमानास्पद! ‘ब्युटी क्वीन’ बनली देशाची ‘ड्युटी क्वीन’!

जगभरात होणाऱ्या सौंदर्यस्पर्धांमध्ये सहभागी व्हावं, त्यात जिंकून यावं आणि आपल्यालाही ‘मिस इंडिया’, ‘मिस युनिव्हर्स’, ‘मिस वर्ल्ड’ किंवा एकतरी टायटल मिळावं अशी देशभरातल्या अनेक सुंदर मुलींची इच्छा असते. मात्र एक सौंदर्यसम्राज्ञी याला अपवाद ठरली आहे, तिने असं काही केलंय, जे प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटेल.

तिने ग्लॅमरऐवजी निवडली देशसेवा!

दरवर्षी ‘मिस इंडिया’ स्पर्धेला दरवर्षी हजारो मुली नाव नोंदवतात.

एक तरी टायटल जिंकावं, अशी त्यांची अपेक्षा असते.

फार कमी मुलींची यात वर्णी लागते.

मात्र त्यानंतर मिळणारं ग्लॅमर, सौंदर्यावर होणारं शिक्कामोर्तब यांनी आयुष्य बदलून जातं.

सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा, दिया मिर्झा, मानुषी चिल्लर यांसारख्या कितीतरी जणींच्या सौंदर्यावर जग फिदा झालं.

अनेक सौंदर्यवती स्पर्धेदरम्यान आपण देशासाठी, जगासाठी काहीतरी अमूल्य योगदान देण्याचं आश्वासन देऊन ‘वाहवा’ मिळवतात.

मात्र अशीच एक सौंदर्यस्पर्धा जिंकणाऱ्या ‘गरिमा यादव’ ही मात्र ग्लॅमरची वाट न चोखाळता भारतीय सैन्यात अधिकारी बनली आहे.

सौंदर्य आणि शौर्य!

गरिमा यादव ही मूळची हरियाणाची आहे.

तिने दिल्ली येथे सेंट स्टफिन्स कॉलेजमधून graduation केलं.

2017 साली झालेल्या सौंदर्य स्पर्धेत गरिमाला ‘मिस चार्मिंग’ हा किताब मिळाला होता.

ती सौंदर्य स्पर्धा मुंबईत पार पडली होती. त्यामुळे मुंबईमध्येच पुढे ती मॉडेलिंग किंवा बॉलिवूडमध्ये करिअर करेल, असं सर्वांना वाटलं होतं.

तिला इटली येथे पार पडणाऱ्या इंटरनॅशनल ब्युटी स्पर्धेसाठीही आमंत्रण आलं.

मात्र तिने ग्लॅमरकडे पाठ करून सैनिकी शिक्षणाकडे लक्ष दिलं.

पहिल्याच प्रयत्नात तिने ‘कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस’ची परीक्षा पास केली.

चेन्नईत ऑफिसर म्हणून प्रशिक्षण घेतलं आणि आता ती लेफ्टनंट बनली आहे.

लष्करात जाण्यासाठी तुम्ही राकट प्रकृतीचं असायला हवं, असा समज प्रचलित आहे. गरिमा यांनी तो खोटा ठरवलाय. आपली बलस्थानं ओळखण्याबरोबरच आपल्यातील कमतरतांवर प्रयत्नपूर्वक मात केली, की आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो, असं लेफ्टनंट गरिमा यांचं म्हणणं आहे. आपल्या करिअरच्या निवडीतून त्यांनी केवळ सौंदर्यच नव्हे, तर शौर्यही सुंदर स्त्रीची ओळख असू शकते, याची प्रेरणा दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *