Thu. Aug 5th, 2021

पुण्यामध्ये लाईट लावताच झाला गॅसचा स्फोट, चिमुकलीचा मृत्यू

पुण्यातील खराडी येथे गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैंवी मृत्यू झाला आहे. स्वराली भवारे असं या सहा महिन्याच्या मृत चिमुकलीचं नाव असून मुलीसह तिचे आई वडीलही यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळी 7:45 वाजताच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. स्फोट होताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. स्फोटात लागलेली आग विझवण्यात आली. यामध्ये स्फोटात आजूबाजूच्या चार घरांचे पत्रे उडाले आहेत.

घरात रात्रभर गॅस गळती होत होती. सकाळी मुलीची आई पाणी गरम करण्यासाठी किचन मध्ये गेल्या. त्यांनी लाईट लावताच गॅसचा स्फोट झाला. स्फोटात आजूबाजूच्या चार घराचे पत्रे उडाले. घरातील अनेक मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाले आहे. घरातील कपडे तसेच किचन मधील अनेक साहित्याचेही आगीत नुकसान झाले आहे.

यात शंकर भवाळे आणि आशा भवाळे अशी जखमींची नावे आहेत. हे खराड मधील संभाजीनगर येथील रहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *