Fri. Nov 15th, 2019

‘गेटवे ऑफ इंडिया’ला आज 94 वर्ष पूर्ण

‘गेटवे ऑफ इंडिया’ ही मुंबईची शान आहे. मुंबईला फिरायला जायचं म्हटलं की पहिली टूर गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होते. 20 व्या शतकातले बांधकाम तसंच वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेले गेट वे ऑफ इंडियाला आज 94 वर्ष पूर्ण झाले आहे. ही वास्तु ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू ठरली आहे.

‘गेटवे ऑफ इंडिया’ कशासाठी बांधण्यात आले? काय आहे या मागचा इतिहास?

 • 1911 मध्ये ऍपोलो बंदर येथे किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या उद्रेकासाठी स्मारक उभारण्यात आले.
 • इंडो-सरैसेनिक शैलीमध्ये बांधलेला, गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी 31 मार्च 1911 रोजी करण्यात आली.
 • ही रचना बेसाल्टची 26 मीटर (85 फूट) उंचीची कमान आहे.

 

gateway3.jpg

 • जॉर्जविटेटची अंतिम रचना 1914 साली मंजूर झाली आणि स्मारक गेटवे ऑफ इंडिया बांधकाम 1924 मध्ये पूर्ण करण्यात आले.
 • गेटवे नंतर व्हिक्टोरियासाठी आणि बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरात आले. आणि त्यानंतर भारतात प्रवेश करण्याची परवानगी दिली.
 • गेटवे ऑफ इंडिया दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी मार्गच्या शेवटी अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर स्थित असून हे शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे.
 • हे 4 डिसेंबर 1924 साली लोकांसाठी खुले करण्यात आले.

gateway1.jpg

 • गेटवे ऑफ इंडिया सोळाव्या शतकातील गुजराती धर्तीच्या शिल्पकेलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
 • पिवळ्या बसातर दगडात ह्या वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे.
 • नजीकच्या ठाणे जिल्ह्यातूनच खरोदी खाणीतून हा दगड काढण्यात आला होता.
 • वास्तूवरील घुमट व सज्जे सलोह कॉंक्रीटचे आहेत.

 

gateway6.jpg

 • वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे.
 • तिच्या लांबीची एक बाजू पूर्वेकडील सागरतीराला समांतर असून या बाजूत मधोमध मोठ्या आकाराचा कमानयुक्त दरवाजा व त्यालगत दोन्ही बाजूस छोटे दरवाजे आहेत.
 • वास्तूची मागची बाजूही सारखीच आहे. या अद्वितीय वास्तूच्या उभारणीसाठी अकरा वर्ष लागले.

 

gateway2.jpg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *