Wed. Apr 21st, 2021

…आली गौराई अंगणी !

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

कोकणात गौरी-गणपतीचा उत्सव सर्वात मोठा उत्सव मानला जातो. सर्वच जण या बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतात. उत्सवात जेवढे बाप्पाला महत्त्व आहे तेवढेचं महत्त्व गौरी उत्सवालाही आहे. बाप्पाचे आगमन झाल्यावर पाचव्या किवां सहाव्या दिवशी गौरीचे आगमन होते. कोकणात तर गौरी आगमन एक अनोखा उत्सव सुवासिनी साजरा करतात. गावातील नदीकाठावर ढोल ताश्यांच्या गजरात गौराईची पूजा करुन तिला घरी आणले जाते.

 

रायगडमध्ये शेतकऱ्यांच्या घरी शेतीच्या बांधावरून गौराईचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. लाडक्या बाप्पाच्या उत्सवात, आनंदात गौराई आणखी भर पाडते. कोकणात बाप्पांसोबतच गौरीपूजनलाही अनोखे महत्त्व आहे. घरा-घरातील सगळ्या महिला या गौरीसणाची आतुरतेने वाट पहात असतात यामध्ये ग्रामीण भागात तर गौरीसणाचे मोठे महत्व असते. अगदी पारंपारिक पद्धतीने गावात गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात. खेडेगावात आजही गौराई रानातून वाजत गाजत आणली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *