Sun. Sep 22nd, 2019

शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरने

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सुकमा नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनं घेतली आहे.

 

गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून आपण मदत करणार असल्याचं गंभीरनं जाहीर केले.

 

दरम्यान शहीद सीआरपीएफ जवानांच्या सन्मानार्थ गौतम गंभीरच्या नेतृत्तात खेळणा-या कोलकाता नाईट रायडर्स संघानं पुण्याविरोधातील सामन्यात हाताला काळी पट्टी बांधली होती.

 

या सामन्यात गंभीरनं अर्धशतक करत संघाला विजय मिळवून दिला. तर, वृत्तपत्रात शहिद जवानांच्या मुलींचा फोटो पाहिल्यानंतर गंभीरला त्यांच्याप्रती आपली जबाबदारी असल्याची ॉ

जाणीव झाली आणि त्यानं हा स्तुत्य निर्णय घेतला.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *