Wed. Jan 19th, 2022

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसातच असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय नेते इतर पक्षात प्रवेश करत असताना दिल्लीमधून भाजपाची उमेदवारी मिळवण्याकरीता माजी क्रिकेटपटू गौमत गंभीरने भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे समजते आहे. तसेच गंभीरला दिल्लीमधून भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपात प्रवेश केला.

गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश –

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरने प्रवेश केला आहे.

गंभीरला दिल्लीमधून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गौतम गंभीरच्या भाजपप्रवेशामुळे दिल्लीमध्ये भाजपाला एक युवा चेहरा मिळाला आहे.

त्याच्या लोकप्रियतेचाही फायदा भाजपाला निश्चितपणे होणार असल्याचे म्हटलं जात आहे.

गौतम गंभीरने गेल्या डिसेंबरमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून सध्या तो क्रिकेट समालोचक म्हणून कार्यरत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *