Wed. May 18th, 2022

‘हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले’ – शरद पवार

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७८व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनिल अवचट यांच्या निधनानंतर अनेक स्तरावर शोक व्यक केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरूवात ठरले. शोकाकुल अवचट कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट केले की, सुप्रसिद्ध आणि संवदेनशील लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे निधन पुण्याच्या सामाजिक-साहित्यिक विश्वात मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. आधी पत्रकार, मग लेखक आणि त्यानंतर सामाजिक कार्यकार्यात त्यांनी स्वत:ला झोकून देणे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांनी अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

2 thoughts on “‘हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले’ – शरद पवार

  1. I think that is among the most vital info for me. And im satisfied studying your article. However wanna remark on few general things, The site style is perfect, the articles is really nice : D. Good job, cheers

  2. I am thinking of buying a joomla template from template monster and importing it into joomla.. . How hard are they to import? Is it plug and play easy? Or will I need to configure plugins etc.. . Thanks..

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.