Sat. May 15th, 2021

ट्रेलरआधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार कलंकचे ‘हे’ गाणे

नुकताच रिलीज झालेला बहुप्रतिक्षीत ‘कलंक’ सिनेमाचा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या टीजरनंतर प्रेक्षकांच्या नजरा ‘कलंक’च्या ट्रेलरकडे लागल्या आहेत.

पण ‘कलंक’च्या मेकर्सनी प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देत ट्रेलर आधी सिनेमाचे गाणे रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या हे गाणे रिलीज होत आहे. त्याआधी आज या गाण्याचा टीजर तुम्हाला पाहता येणार आहे.

‘घर मोरे परदेसिया…’ असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याच्या टीजरमध्ये माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट, आदित्य कपूर, संजय दत्त, वरूण धवन यांची झलक पाहायला मिळत आहे.

प्रीतमने कंम्पोज केलेल्या या गाण्यात आलिया कथ्थक करताना दिसणार आहे.

अद्याप ‘कलंक’च्या कथेबद्दल फार खुलासा झालेला नाही. पण चर्चा खरी मानाल तर हा चित्रपट हिंदू- मुस्लिम वादावर आधारित आहे.

शूटींग सुरु झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे.

View this post on Instagram

Ghar More Pardesiya – Out Tomorrow ❤️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

40 च्या दशकाची कथा असलेल्या या सिनेमात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दमदार कलाकार आहेत.

हा सिनेमा येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *