Wed. Jun 19th, 2019

शेगावात भूत चक्क CCTV मध्ये कैद, व्हिडीओ व्हायरल

0Shares

शेगाव शहरात सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये मध्यरात्रीनंतर शहरातील वाटीका चौकातील एका हॉटेलच्या सिसिटीव्ही कॅमेरामध्ये भूत सदृष्य चित्र कैद झाले असून सिसिटीव्ही कॅमे-याचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. CCTV मध्ये कैद त्याच्या अंगात पांढराकपड़ा असून त्याला पाय व मुंडकं नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शरीर नसलेला व्यक्ती वेगाने चौकातून जात असतांना दिसत आहे. हे नेमके काय आहे याबाबत दिवसभर तर्कवितर्क लावण्यात येत असून भूत दिसल्याची खमंग चर्चा सुरु आहे.

व्हायरल व्हिडीओची सर्वत्र चर्चा

अनेक वेळा भूत दिसले अशी चर्चा होत असते.

परंतु शेगाव मध्ये चक्क भूत सिसिटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याचे म्हटलं जात आहे.

एका हॉटेलच्या कॅमेरामध्ये हे भूत कैद झाले असल्याचे सांगितलं जात आहे.

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज प्रगत जगात विज्ञानप्रसार व काही अंशी विज्ञानवृत्तीचा प्रसार झाल्यामुळे हा प्रकार धक्कादायक आहे.

भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाच विद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’काही अंशी अजून शिल्लक आहे.

कायद्याने तर ती पूर्णत अमान्य केली असून मात्र आजही काही लोक यावर विश्वास ठेवला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: