Sun. Sep 19th, 2021

ठाकुर्ली स्थानकातील गर्डरचं काम पूर्ण, रेल्वेसेवा पूर्ववत

मध्य रेल्वे मार्गावरील ठाकूर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पुलासाठीच्या गर्डर बसवण्याचं काम पूर्ण झालं आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वेने ट्विटद्वारे दिली आहे.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील उभारलेल्या पूलासाठी ४०० मेट्रिक टन वजनाचे एकूण 4 गर्डर चढवले गेले.

ठाकूर्ली स्थानकात गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेकडून बुधवारी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता.

या कामासाठी कल्याण-डोंबिवली स्थानका दरम्यान सकाळी 9.45 ते 1.45 या चार तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता.

या विशेष मेगाब्लॉकमुळे डोंबिवली स्थानकात प्रवाशांची गैरसोय झाली होती. प्रवाशांनी डोंबिवली स्थानक प्रबंधकाच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला होता.

ऑफीसला जाण्याच्या वेळी धीम्या मार्गावरील रेल्वे नसल्याने प्रवाशी आक्रमक झालेले पाहायला मिळाला.

या विशेष मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी केडीएमसीच्या बसेस सोडण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *