Tue. Sep 28th, 2021

ज्येष्ठ लेखक,अभिनेते गिरीश कर्नाड यांच 81 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ लेखक गिरीश कर्नाड यांचं अल्पशा आजारानं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्यावर्षी प्रदीर्घ आजाराने त्यांच निधन झालं आहे. अभिनेते, दिग्दर्शक, प्रख्यात नाटककार, साहित्यिक, म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. बेंगळुरू येथील राहत्या घरी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाड यांच्या उपचार सुरू होते.मल्टिपल ऑर्गन फेल्युअर मुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने चित्रपट, नाट्य आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

चित्रपट, नाट्य आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा

गिरीश कर्नाड यांचा 19 मे 1938 रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला.

कन्नड़ आणि इंग्रजी या दोन्ही भाषामध्ये त्यांची साहित्यसंपदा होती.

कर्नाड यांच्या तुगलक, हयवदन, तलेदंड, नागमंडल व ययाति अश्या लोकप्रिय नाटकांची भाषांतरं अनेक प्रादेशिक भाषा मध्ये झाली होती.

मालगुडी डेज ही त्याची मालिका सर्वाधिक गाजली होती.कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते.

कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार अशी त्यांची ओळख होती.

तुघलक, नागमंडल आणि हयवदन या मराठी नाटकांचे देखील त्यांनी दिग्दर्शन केले होते.

गिरीश कर्नाड यांनी वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते.

हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता.या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

कर्नाड हे 1976-78 मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि 1988-93 मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते.

त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आले होते.

हिंदुस्थानातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार 1998 मध्ये त्यांना देण्यात आला होता.

जेष्ठ साहित्यिक, अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक, गिरीश कर्नाड यांना मिळालेले पुरस्कार

1972- संगीत नाटक अकादमी पुरस्कार

1974 – पद्मश्री

1992 – पद्मभूषण

1992 – कन्नड़ साहित्य अकादमी पुरस्कार

1994- साहित्य अकादमी पुरस्कार

1998- ज्ञानपीठ पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *