Thu. Apr 22nd, 2021

‘… नाही तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार’ – अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणासाठी बसले आहे. सरकार अण्णांच्या मागण्यांना दुर्लक्ष करत असल्याचीही चर्चा केली जात आहे. यासाठी सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली.

मात्र जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. तसेच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ८ फेब्रपवारीला पद्मभूषण पुरस्कार परत करणार असल्याचा इशारा अण्णांनी दिला आहे.

भेटीत काय चर्चा झाली ?

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली.

सरकार अण्णांच्या मागण्यांवर सहमत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

अण्णांनी उपोषण सोडावे असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन वरून अण्णांशी चर्चा केली.

नवा कायदा तयार करण्यासाठी ड्राफ्टिंग कमेटीची स्थापना करण्याचे सरकारने मान्य केलं.

त्याबाबतच पत्र घेऊन गिरीश महाजन अण्णांची पुन्हा भेट घेणार.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *