Sat. Jul 2nd, 2022

मुंबईच्या बंगल्यावर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात – गिरीश महाजन

आपल्या मुंबईतील बंगल्या वरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

आपल्या मुंबईतील बंगल्या वरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. येत्या निवडणुकीमध्ये ममता दीदींच्या सुपडा साफ करू अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे व्यक्त केलेली आहे. पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा होत असतो. हे सांगताना 42 भाजपच्या कार्यकर्त्यांचे कम्युनिस्टांनी खून केले आहेत. तरीसुद्धा कार्यकर्ते मागे म्हटले नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे पक्षाच्या विस्तार सभेमध्ये ते बोलत होते.

काय म्हणाले गिरीश महाजन?

गेल्या निवडणुकीमध्ये आपण ठरवलेल्या आकड्यांपेक्षा जास्त जागा निवडून आल्याने आपल्याला सुद्धा धक्का बसल्याचं त्यांनी यावेळी म्हटले आहे.

भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या आता वाढलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे राहायला त्यांचे नेते तयार नाहीत.

आपल्या मुंबईतील बंगल्या वरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात.

आपल्याला पुढे पाहू म्हणून टाळून जावे लागते अशी स्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झाली आहे.

आगामी निवडणुकीमध्ये 50 पेक्षा जास्त जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळणार नाही. असा आपला ठाम मत असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.