Wed. Jan 19th, 2022

आघाडीचे 25 आमदार भाजपाच्या संपर्कात – गिरीश महाजन

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची वाईट अवस्था होईल सध्या काँग्रेस व्हेंटिलेटरवर आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत तर अनेक नेत्यांची भाजपकडे ओढ आहे असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. महाजन यांनी दिली जय महाराष्ट्रला प्रतिक्रिया देत असताना त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

शरद पवारांचा आत्मविश्वास संपला आहे.

देशातील काय आणि राज्यातील काय काँग्रेस व्हेंटिलेटरवर आहे.

देशात विरोधी पक्ष नेता नाही अशी परिस्थिती आहे.

राज्यात ही विरोधी पक्ष नेते यांनी आपल्या कार्यालयातील सामान देखील बाहेर काढलय

राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची वाईट परिस्थिती आहे

लोकांचा ओढा भाजपकडे आहे त्यांना हवेचा वेध कळला आहे.

25 पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत.

अनेकांना काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना सोडायची आहे काँग्रेस हे भरकटलेले जहाज आहे.

शरद पवार EVM मशीनला दोषी धरत आहेत शरद पवार यांनी विश्वासर्हता गमावलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *