धक्कादायक! कलिंगडच्या सालीत गुंडाळलेले सापडले पाच महिन्याच्या मुलीचे अर्भक

नोएडातील गेझा गावात कलिंगडाच्या सालीत गुंडाळलेले पाच महिन्याच्या मुलीचे अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कलिंगडाच्या सालीत गुंडाळून नाल्यात फेकल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सफाई कामगार साफसफाई करण्यासाठी गेले असताना हा प्रकार उघडकीस आला.

नेमकं काय घडलं ?

नोएडामधील गेझामध्ये कलिंगडाच्या सालीत गुंडाळलेले पाच महिन्याच्या चिमुरडीचे अर्भक सापडले आहे.

साफसफाई करण्यासाठी गेलेल्या सफाई कामगाराला अर्भक नाल्यात सापडले.

भारतात गर्भपात बेकायदेशीर असले तरी 1971 च्या वैद्यकीय गर्भपात कायद्याअंतर्गत 20 आठवड्यापूर्वी गर्भपात करण्यास मान्यता दिली आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 318  अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या नावे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहेे.

कलिंगडच्या सालीत गुंडाळलेल्या स्थितीत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version