Thu. Aug 5th, 2021

मेट्रिमोनियल साईटवर ‘ती’ जुळवायला गेली रेशीमगाठ, लैंगिक अत्याचार करून मुलाने फिरवली पाठ

सध्याच्या डिजिटल युगात लग्न जुळवण्याची पारंपरिक पद्धतही ऑनलाइन झाली आहे. लग्न जमवण्याच्या जुन्या पद्धतीमध्ये मध्यस्थी असायची. मात्र, या ऑनलाइन पद्धतीत मध्यस्थाची जागा डिजिटल प्लॅटफॉर्मने घेतली. ऑनलाईन लग्न जमवण्याची पद्धत किती धोकादायक असू शकते याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड येथील एका तरुणीला आलेला आहे.

जीवनसाथी मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख तसेच मैत्री वाढून 31 वर्षीय युवकाने 27 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रावेत येथे घडली आहे. लग्नाचं आमिष दाखवून 27 वर्षीय तरुणीला वेगवेगळ्या प्रकारे भूलथापा देत आदित्य चोबे या तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

आरोपी हा IT सेक्टर मध्ये कार्यरत आहे. मेट्रोमोनीअल साईटवर दोघांची काही महिन्यापूर्वी ओळख झाली होती. त्याने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवलं. लग्नापूर्वीच त्याने शरीरसुखाची मागणी करण्यास सुरूवात केली. तरुणीवर त्याने लैंगिक अत्याचार केले. यानंतर मात्र आदित्यने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर महिलेने तात्काळ रावेत पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी आरोपी आदित्य चोबे यास ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.घटनेचा अधिक तपास रावेत पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *