Sat. Jul 31st, 2021

बॉयफ्रेंडचं ‘हे’ स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने केले असे काही…

एकमेकांच्या प्रेमात असणारे प्रियकर-प्रेयसी प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात हे आपण अनेकवेळा ऐकलं आहे. पण गुजरातमध्ये प्रत्यक्षात असे काही घडले आहे. आपल्या प्रियकराचे पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्रेयसीने आपल्याच घरात तब्बल 1 कोटी रुपयांचा ऐवज चोरला असल्याची धक्कादायक घटना गुजराथमधील राजकोट शहरात घडली आहे. पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला ताब्यात घेतले असून याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.

नेमकं काय घडलं ?

  • प्रियांका परसाना असे चोरी करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील राजकोटमधील अत्यंत श्रीमंत व्यापारी आहेत. गेल्या 2 वर्षांपासून हेत शहा आणि प्रियांकाचे प्रेमसंबंध आहेत.
  • दोघेही सीएची तयारी करत होते, पण हेतला पायलट होण्याची इच्छा होती. बेंगळुरूच्या पायलट ट्रेनिंग अकादमीत त्याची निवडही झाली होती.
  • पण फी भरण्यासाठी 20 लाख रुपये कमी पडत होते. त्यामुळे त्याला मदत करण्यासाठी प्रियांकाने 5 तोळे सोनं आणि 64 हजार रुपये चोरले. त्यानंतर हा ऐवज घेऊन हेत बेंगळुरुला निघून गेला.
  • घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच प्रियांकाच्या वडलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
  • पोलिसांनी 17 दिवस तपास केला. घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकही संशयास्पद व्यक्ती आले नसल्याचे कळल्यावर पोलिसांनी प्रियांकाची चौकशी केली.
  • तसेच हेतलाही ताब्यात घेतले. तेव्हा या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला.

आता या तरुणीच्या कुटुंबाला सगळा ऐवज परत मिळाला असून ते एफआयआर मागे घेण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *