Sun. May 16th, 2021

मेडिकल शॉपवाल्याकडून ‘अशी’ फसवणूक; प्रेम, शारीरिक संबंध आणि…

प्रेमाचं नाटक करून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराच्या फसवणुकीमुळे मुंबईतील जुहू परिसरात तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी धीरज वीरेंद्र साह या 29 वर्षीय आरोपीला अटक केलं आहे. धीरज साह याचं त्याच परिसरात मेडिकल शॉप आहे.

काय घडलं नेमकं?

30 वर्षीय पीडित तरुणी विलेपार्ले येथे आपल्या भावासोबत राहते.

याच परिसरात धीरज साह याचं मेडिकल शॉप होतं.

औषधं आणि तत्सम गोष्टी घेण्याच्या निमित्ताने पीडत तरुणी ये मेडिकल शॉपमध्ये अनेकद येई.

यातूनच दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले.

एकदा धीरज या तरुणीला वर्सोवा येथील हॉटेलमध्ये डेटवर घेऊन गेला.

त्यानंतर दोघं तिच्या घरी गेले.

यावेळी त्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली.

तरुणीनेही त्याला होकार दिला.

यानंतर धीरजने अनेकदा या तरुणीशी शरीरसंबंध ठेवले.

मात्र अद्याप त्याने तिच्याशी लग्न केलं नव्हतं.

त्यामुळे ती लग्नासाठी वारंवार त्याच्यामागे लागली होती.

तेव्हा धीरजने ओशिवरा परिसरातील एका मंदिरात तिच्याशी विवाहाचं नाटक केलं.

धीरजबद्दल धक्कादायक माहिती!

विवाहानंतर धीरजने अनेकदा या पीडित तरुणीशी शरीरसंबंध ठेवत होता.

मात्र आपल्या घरी घेऊन जात नव्हता किंवा आपल्या नातेवाईकांना भेटवतही नव्हता.

यामुळे तरुणीला शंका येऊ लागली. तिने धीरजबद्दल माहिती काढायला सुरुवात केली.

तेव्हा धीरजचं 4 वर्षांपूर्वीच विवाह झाल्याची धक्कादायक खबर तिला मिळाली.

या गोष्टीने तिला धक्का बसला. यासंदर्भात तिने धीरजशी बोलायचा प्रयत्न केल्यावर धीरज तिला टाळू लागला.

यामुळे नैराश्य आलेल्या तरुणीने 27 एप्रिल रोजी 30 झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्याच वेळी तरुणीचा मित्र तिथे आला आणि तिला बेशुद्धावस्थेत पाहून तिला रूग्णालयात घेऊन गेला. सध्या या तरुणीवर उपचार सुरू असून तिची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी या प्रकरणी धीरज साह याला अटक केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *