Fri. May 7th, 2021

प्रेयसीनेच केला प्रियकरावर अॅसिड हल्ला; काय होतं कारण ?

अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथील पत्नीला पेटवून देण्याची घटना ताजी असतानाच एका तरूणावर अॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. तरूणावर अॅसिड हल्ला त्याच्याच प्रेयसीने केल्याचे उघडकीस आले आहे. हा हल्ला नगर शहरातील प्रमेदान चौकातील एका कॅन्टीनमध्ये घडला आहे. अमीर रशीद शेख याच्यावर हा अॅसिड हल्ला करण्यात आला. प्रेमप्रकरणातून हा अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी अमीर रशीद शेखच्या प्रेयसीला अटक केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नगर शहरातील प्रेमदान चौकात ६ मे रोजी एका तरूणावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता.

हल्लेखोराने बुरखा परिधान केल्यामुळे आरोपीची ओळख पटली नव्हती.

मात्र पोलिसांनी अमीर रशीद शेखच्या प्रेयसीची कसून चौकशी केल्यावर हा हल्ला तीनेच केल्याचे समोर आले.

अमीर रशीद शेखचे दुसऱ्या मुलीवर प्रेमसंबंध असल्यामुळे रागाच्या भरात त्याच्या अॅसिड हल्ला केला.

हल्लेखोराचे नाव अंजुम शेख असून तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर तीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला.

अमीरला हॉटेलवर बोलावून हा हल्ला केल्याचे अंजुमने सांगितले आहे.

क्राईम सीरियल बघून हा हल्ला केल्याचे प्रेयसीने कबूल केले.

अमीर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *