अक्षरधाम मेट्रो स्थानकावर आत्महत्या

१४ एप्रिल रोजी (गुरुवारी) अक्षरधाम मेट्रो स्थानकावर एका महिलेने भिंतीच्या कठड्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडताच मेट्रो स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता. उडी मारल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी जाळी लावून महिलेला वाचवलं मात्र, नंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
नवी दिल्लीतील अक्षरधाम मेट्रो स्थानकावर महिलेने भिंतीच्या कठड्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून महिलेला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. सर्व शक्य प्रयत्न करूनही महिलेने कठड्यावरून उडी मारली, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी इमारतीच्या खाली जाळी लावली होती, त्यामुळे महिलेने खाली उडी घेतल्यामुळे काही जखमा झाल्या होत्या. पुढील उपचारासाठी तिला तातडीने लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे.
मात्र, अद्याप या तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण उघडकीस झाले नाही.