Thu. Sep 19th, 2019

गिरणी कामगारांनी असे केले गणेश विसर्जन…

0Shares

इंदूरमध्ये गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडला. गणेश विसर्जनाची मिरवणूक इंदूरचा सर्वात मोठा उत्सव असतो. नेत्रदीपक अशी विद्युत सजावट असलेल्या चलित देखाव्यांची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी उसळते. 

इंदूरमध्ये अनंत चतुर्दशीला चलित देखावे काढण्याची परंपरा जवळपास 90 वर्षापूर्वींपासून आहे. 

गिरणी कामगारांची ही परंपरा असून त्यांनी यंदाही ही परंपरा अबाधित राखली आहे. कापड गिरण्या बंद पडल्या पण गिरणी कामगारांची बाप्पावरची आस्था कमी झाली नाही.

वर्गणीच्या मदतीने त्यांनी ही परंपरा कायम ठेवली. यंदाही कामगारांनी सुंदर देखव्यांची निर्मिती केली.

या शिवाय इंदूर नगर निगम, इंदूर विकास प्राधिकरण, जैन समाज व इतर संस्थानचेही देखावे मिरवणूकीमध्ये सहभागी झाले. सर्वात पुढे प्रसिद्ध खजराना गणपतिचा देखावा होता, नंतर नगर निगम, प्राधिकरण आणि मालवा, कल्याण, स्वदेशी इत्यादि गिरण्यांचे देखावे होते.

धार्मिक, सामाजिक आणि सरकारी योजनांवर हे देखावे आधारलेले होते.आकर्षक रोशनाईने सजविलेले हे देखावे लोकांना मंत्रमुग्ध करीत होते. अखाड़े व त्यांचे कलाकार आपल्या कौशल्याने लक्ष वेधुन घेत होते. रात्रभर देखाव्यांची ही मिरवणूक निघत होती. मिरवणूकीसाठी पोलिसांचा बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *