Sat. Jul 31st, 2021

राहुल गांधींना विष पाजा आणि जगतात का पाहा – वसावा

लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे राजकिय नेत्यांचे आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान राजकीय नेते एकमेकांवर विधान करत चिमटा काढत असतात. एका काँग्रेस नेत्याने आपले पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचं कौतुक करताना त्यांना थेट शंकराचा अवतार म्हटलं होतं. या विधानावर वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच भाजप नेते  आणि गुजरातचे पर्यावरण मंत्री गणपत वसावा यांनी त्यावरही कडी केली आहे. “शंकराप्रमाणेच राहुल गांधी यांना विष पाजा, आणि ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत जिवंत राहतात का, ते पाहा.” असं विधान वसावा यांनी केलं. या विधानामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे.

‘राहुल गांधींच्या शंकरावताराचे पुरावे द्या!’

गुजरातचे पर्यावरण मंत्री गणपत वसावा यांनी राहुल गांधीवर खोचक विधान केलं.

‘राहुल गांधींना शंकराप्रमाणे विष पाजा, आणि निवडणुकीच्या निकालापर्यंत जिवंत राहतात पाहा?’ असं हे विधान होतं

राहुल गांधी यांचा एका काँग्रेस नेत्याने शंकराचा अवतार असा उल्लेख केला होता, यावर वसावा यांनी ही टीका केली आहे.

पाकिस्तानमधील कारवाईचा पुरावे मागता,  मग राहुल गांधी शंकराचा अवताराचेही पुरावे द्या.

शंकर लोकांचे दु:ख दूर करण्यासाठी विष प्यायले होते.

मग राहुल गांधीना पण विष पाजा, असंही ते म्हणाले आहेत.

“विष पाजल्यानंतर राहुल गांधी जर निवडणुकांपर्यंत जिवंत राहिले, तर ते शंकराचा अवतार आहेत हे सिद्ध होईल;” असा चोलाही त्यांनी हाणला आहे. मात्र वसावा यांच्या विधानवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे वसावा यांच्या विधानानंतर काँग्रेसकडून कोणती प्रतिक्रिया ययेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *