Sat. Oct 16th, 2021

आता E-mail करणं होणार अधिक सोपं, Gmail मध्ये आले ‘हे’ नवीन फीचर्स

Googleने गेल्यावर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmailलाँच केले होते.

त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभराने ई-मेल सर्व्हिसमध्ये बदल करण्यात आले आहे. Googleने Gmail च्या कंपोज विंडोमध्ये Undo आणि Redo च्या शॉर्टकटचा समावेश केला आहे.

Gmailच्या Latest Updateमध्ये कंपोज विंडोच्या टास्क बारमध्ये Undo आणि Redo या शॉर्टकटचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन फीचर्स हे टास्कबारच्या सुरुवातीला अ‍ॅड करण्यात आला आहे. फॉन्ट टाईप आणि फॉन्ट साईझ पर्यायाआधी हे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्सना आता मेल करताना या गोष्टीचा चांगलाच फायदा होणार आहे.

Undo आणि Redo सोबतच स्ट्रायकथ्रू हे नवीन बटण अ‍ॅड करण्यात आलं आहे. ज्यांना कीबोर्डवरचे शॉर्टकट पसंत नाहीत अशा लोकांना या बटणाचा अधिक उपयोग होणार आहे.

Undo आणि Redo प्रमाणेच या बटणाचा देखील मेल करताना फायदा होणार असल्याचे गुगलने म्हटले आहे.

गुगलने EML फॉर्मेटमध्ये मेसेज डाऊनलोड करण्याचा पर्यायही अ‍ॅड केला आहे. त्यामुळे युजर्सना मल्टीमीडिया फाईल्स ऑफलाईन यूज करण्यासाठी डाऊनलोड करता येणार आहेत.

हे फीचर लवकरच सर्व Gmail युजर्ससाठी रोलआउट करण्यात येणार आहे. गुगलने हे फीचर्स GSuite युजर्ससाठी रोलआऊट करायला सुरुवात देखील केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *