Fri. Sep 17th, 2021

काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जाऊन मृतदेह मोजून यावं – राजनाथ सिंह

कपिल सिब्बल यांनी सोमवारीच आम्हाला दहशतवाद्यांचे मृतदेह पाहायचे आहेत असे म्हणत एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले. तसेच इतर काँग्रेस नेत्यांनीही या स्ट्राईकवर संशय व्यक्त केला.

300 दहशतवादी ठार झाले हा दावा भाजपाकडून कोणत्या आधारावर केला जात आहे? असा प्रश्नही काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला.

या सगळ्या गोष्टींना उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना ‘काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावं आणि मृतदेह मोजून यावं’ असा खोचक सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला दिला आहे. त्यांच्या टीकेला राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तरही दिले आहे. आसामच्या धुबरी या ठिकाणी राजनाथ सिंह बोलत होते.

काय म्हणाले राजनाथ सिंह ? 

भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक करून जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. अनेक दहशतवाद्यांना ठार केले.

नेमके किती दहशतवादी ठार झाले याचा अधिकृत आकडा आज किंवा उद्या कळेलच मात्र विरोधी पक्ष या सगळ्याचे राजकारण करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला आहे.

काही पक्ष फक्त इतकेच प्रश्न विचारत आहेत की सांगा किती अतिरेकी मेले? सांगा किती अतिरेकी मेले? वायुसेना पाकिस्तानात जाऊन कारवाई करेल की एक, दोन, तीन असे दहशतवादी मोजून त्यांना मारत बसेल? स्ट्राईक करणे म्हणजे काय गंमत वाटते का? असाही उपरोधिक प्रश्न राजनाथ सिंह यांनी विचारला.

NTRO च्या सर्व्हिलन्सने हा दावा केला आहे की सर्जिकल स्ट्राईक होण्याआधी बालाकोट भागात 300 मोबाईल सक्रिय होते.

तिथे आम्ही एअर स्ट्राईक घडवून आणला. आता एनटीआरओच्या आकडेवारीवरही विरोधक विश्वास ठेवत नसतील तर काय करणार? असाही सवाल राजनाथ सिंह यांनी विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *