Mon. Aug 15th, 2022

मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना शनिवारी रात्री गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. यामुळे पर्रिकरांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.

नेमकं काय झालं ?

शनिवारी रात्री मनोहर पर्रिकरांची प्रकृती खालावली.

त्यामुळे त्यांना गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीसाठी पर्रिकरांना रुग्णालयात दाखल करण्यात असल्याचे समजते.

पुढील ४८ तास त्यांना डॉक्टरचा देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात केली आहे.

मनोहर पर्रिकर यांना व्हॅटिंलेटरवर ठेवण्यात आल्याची बातमी समोर आली होती.

मात्र मनोहर पर्रिकर यांना निवासस्थानी भेटल्यानंतर मंत्री विजय सरदेसाई यांनी या वृताचे खंडन केले आहे.

पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.

त्यासाठी त्यांनी गोवा, मुंबई, न्यूयॉर्क आणि दिल्लीमधील रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.