Jaimaharashtra news

काय म्हणायचं आता? मंदिरातून चक्क देवाचे डोळेच चोरट्यांनी चोरले

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

चोरांच्या वक्रदृष्टीमुळे आता मंदिरातील देवही सुरक्षित राहिले नाहीत. पुण्याच्या अखिल दत्तवाडी म्हसोबा मंदिरातून चक्क देवाचे डोळेच चोरण्यात आल्याची घटना समोर

आली आहे.

 

चोरीची ही घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीतसुद्धा कैद झाली आहे. एक तरुण आधी मंदिरात आला. देवासमोर नतमस्तक झाला आणि आसपास कोणीही

नसल्याचे पाहून चुपचाप मुर्तीचे डोळे काढून खिशात टाकले.

 

त्यानंतर केलेलं पापक्षालन म्हणून की काय तो चोर पुन्हा एकदा देवासमोर नतमस्तक झाला आणि सहजतेने डोळे चोरुन मंदिरातून पसार झाला.

 

सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा पोलीस कसून शोध घेत असून, ताप्पुरत्या स्वरुपात पोलिसांनी मूर्तीला दुसरे डोळे आणून लावले आहेत.

Exit mobile version