Wed. Jul 28th, 2021

‘गॉड ऑफ क्रिकेट’ची पूरग्रस्तांना मदत; तुम्हीही मदत करा नागरिकांना आवाहन

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारासह कर्नाटक, केरळ, गुजरात येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे हाल झाले असून संसार उद्धवस्त झाला आहे. सामन्य जनतेपासून राजकीय नेते, कलाकारांनी पूरग्रस्तांना मदत पोहोवण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रिकेट विश्वातला देवता सचिन तेंडुलकरने सुद्धा ट्विट करत मदत करण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाला सचिन तेंडुलकर ?

मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर कर्नाटक, केरळ, गुजरातमध्ये ही मुसळधार पाऊस पडल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

क्रिकेट विश्वातील देवता सचिन तेंडुलकरने ट्विट करत माहिती दिली आहे.

पुरामुळे मोठे नुकसान झाले असून पाण्याची पातळी कमी होत असल्याचे म्हटलं जात आहे.

पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली असल्याचे सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.

तुम्ही सुद्धा पूरग्रस्तांना मदत करत पाठिंबा द्या असे सचिनने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

त्याचबरोबर काही फोटो पोस्ट करत पूरपरिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *