Tue. May 17th, 2022

सोने आणि चांदीच्या दरात घसरण

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान येथे मिनी लॉकडाउन सुरु असून यंदाच्या गुढीपाडव्यावर गतवर्षीप्रमाणे कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिक धास्तावले आहेत. सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांसाठी मात्र खरेदी संधी आहे.
कोरोना रुग्णवाढीने राज्यात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू आहेत. सराफ व्यवसायिकांनी देखील याकाळात दुकाने बंद ठेवली आहेत. दरम्यान, आज सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर दबाव दिसून आला. तर गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल करण्याची मागणी सराफ व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४६५०८ रुपये असून त्यात ८५ रुपयांची किंचित घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६६७९४ रुपये असून त्यात १८९ रुपयांची घसरण झाली आहे.

जागतिक बाजारात मात्र सोने दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव १७४०.५७ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.२ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २५.१९ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.२ टक्के घसरण झाली आहे. कमॉडिटी विश्लेषकांच्या मते अमेरिका आणि चिनी अर्थव्यवस्था सावरत असल्याने गुंतवणूकदार सोन्यातून गुंतवणूक काढून घेत आहेत.

सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४७२० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५७२० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५६७० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९८२० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३७८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७७६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५८७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५७० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.