Thu. Jun 17th, 2021

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने झाले स्वस्त

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्व असते. जर तुम्हीअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दागिना खरेदी कऱण्याचा विचार करीत असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर ग्राहकांसाठी आज चांगली संधी आहे. कारण आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. आज १० ग्रॅम सोन्याचा दर हा ४७ हजार ४३८ इतका झाला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा दर ४७ हजार ४३८ प्रतितोळे रुपयांना बंद झाला. आज सोन्याचे भाव दिवसभर काही प्रमाणात स्थिर होते. याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे.

मुंबईत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४ हजार ८५० रुपये प्रतितोळे इतका असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४५ हजार ८५० रुपये प्रतितोळे इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *