Mon. Jul 22nd, 2019

‘सोन्याचं शौचालय’… ‘सेल्फी’साठी लोकांची झुंबड!

0Shares

युनायटेड किंग्डमच्या ब्लेनहिम पॅलेसमध्ये चक्क सोन्याचं कमोड बसवण्यात येत आहे. हे शौचकूप 18 कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

ब्लेनहिम पॅलेस हे ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा घर आहे.

या घरात त्यांच्या दालनानजिकच हे सोन्याचं कमोड ठेवण्यात येणार आहे.

या सोन्याच्या टॉयलेटच्या सुरक्षेसाठी खास सुरक्षाव्यवस्ता करण्यात येणार आहे.

मॉरिजो कॅटिलेन यांनी हे शौचकूप तयार केलं आहे.

विशेष म्हणजे या सोन्याच्या शौचालयाचा वापर सामान्य नागरिकांनाही करता येणार आहे.

 

सोन्याचं शौचालय वापरण्यासाठी आधी बुकिंग आवश्यक

हे शौचकूप आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना भेट देण्यात येणार होतं.

गुगेनहिम संग्रहालयाने तशी इच्छा आधी व्यक्त केली होती.

मात्र आता युनेस्कोने या शौचालयाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये केला आहे.

हे कमोड खरंतर येथे प्रदर्शनासाठी असणार आहे.

मात्र या कमोडचा वापर सामान्य नागरिकांनाही करता येणार आहे.

मात्र त्यासाठी आधीच बुकिंग करणं आवश्यक आहे.

आत्तापर्यंत हे सोन्याचं शौचालय 1 लाखांहूनही जास्त लोकांनी पाहिलं असल्याचं वृत्त आहे.

या कमोडसोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांची येथे मोठ्या प्रमाणावर झुंबड सध्या उडतेय.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: