Wed. Oct 16th, 2019

35 कोटी किमतीचं सोन्याचं कमोड गेलं चोरीला!

इंग्लंडच्या ब्लेनहेम पॅलेसमधल्या शौचालयातील 18 कॅरेट सोन्याचं कमोड चोरीला गेलंय. या सोन्याच्या कमोडची किंमत 35 कोटी एवढी आहे. हे कमोड ब्लेनहेम पॅलेसमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या जन्मस्थळानजिक ठेवण्यात आलं होतं. हे कमोड अत्यंत लोकप्रिय झालं होतं. पर्यटक खासकरून हे कमोड पाहायला आणि कमोडसोबत सेल्फी काढायला येत.

संबंधित बातमी- ‘सोन्याचं शौचालय’… ‘सेल्फी’साठी लोकांची झुंबड!

अमेरिका गेली चोरीला!

सोन्याचं कमोड अमेरिका नावाने ओळखलं जातं.

न्यूयॉर्कमध्ये 2016 साली या कमोडचं प्रदर्शन झालं होतं

ब्लेनहेम पॅलेसमध्ये प्रदर्शनात हे सोन्याचं कमोड ठेवलं होतं.

18 कॅरेट सोन्याचं हे कमोड वापरात होतं.

प्रदर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना विशेष फी भरून या कमोडचा वापर करता येऊ शकत होता.

हे सोन्याचं कमोड इटलीतल्या मॉरिझिओ कॅटेलन यांनी तयार केलं होतं.

शनिवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता या सोन्याच्या कमोडची चोरी झाली.

या प्रकरणात पोलिसांनी एका 66 वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलंय. पुढील तपास सुरू आहे. या चोरीनंतर काही दिवसांसाठी ब्लेनहेम पॅलेस बंद ठेवण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *