Jaimaharashtra news

कोरोना लसीकरणात गोंदियातील महिलांनी मारली बाजी

गोंदिया: कोरोना लसीकरणात गोंदिया जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रस्थानी असून गोंदियामध्ये आतापर्यंत ५ लाख ३२ हजार ४१३ लसीकरण झाल्याची नोंद आहे. या लसीकरण मोहिमेत गोंदियातील महिलांनी बाजी मारली आहे असून तब्बल ११ हजार १९९ महिला ह्या पुरुषांपेक्षा पुढे आहेत.

गोंदियातील महिलाशक्तीने ‘हम किसी से कम नही’ हे दाखवून देत लसीकरण मोहिमेत आघाडी घेतली आहे. गोंदिया जिल्ह्यातील लसीकरण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ८०६ महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. राज्यात सर्वाधिक महिलांचे लसीकरण केलेला गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

 

Exit mobile version